टीव्हीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेल्या “नागीन -4’शी संबंधित बातम्या येत आहेत, ज्यात अभिनेत्री रश्मी देसाईचे चाहते थोडे निराश होवू शकतात. होय, एकता कपूरच्या “नागीन -4’मध्ये लवकरच काही बदल दिसू शकतात आणि हा बदल रश्मी देसाईशी संबंधित आहे. लॉकडाऊन आणि शोमधील व्यत्ययानंतर मेकर्स शोमध्ये मोठे बदल करण्यार आहेत.
या शोमध्ये नुकतीच प्रवेश करणारी आणि बिग बॉस -13 स्पर्धक म्हणून काम करणारी अभिनेत्री रश्मि देसाई या शोचा भाग होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत निर्मात्यांसमवेत बैठक झाली असून अलीकडेच एन्ट्री घेतलेल्या रश्मी देसाई साकारत असलेली शलाखाची भूमिका पुढे केली जाणार नाही. तसेच रश्मीचे मानधन अधिक असलयाने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. याशिवाय निया शर्मा आणि विजयेंद्र कुमेरिया यांचा निर्णयही अद्याप बाकी आहे.
दरम्यान, रश्मी देसाई तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिने ग्लॅमरस फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये रश्मी देसाई खूपच बोल्ड दिसत होती. हा तिचा नवीनल लुक चाहत्यांना खूपच आवडला आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर रश्मी देसाई सतत चर्चेत असते.