Raosaheb Danve । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपावरून सुरु असणारा गोंधळ काही केल्या संपत नाही. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मित्रपक्षांचा आदर करू असे आश्वासन दिलय. महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गट जागा वाटपावरून असून अडून असल्याच्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे ४८ जागांचा तिढा कसा सुटणार हा पेच निर्माण झालाय. त्यातच भाजपच्या नेत्यांने लोकसभेच्या उमेदवारांची यादी सांगितली आहे.
भाजपाचे नेते रावसाहेब दानवे नाशिकमध्ये Raosaheb Danve ।
भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी लोकसभेच्या उमेदवारांची यादीच वाचून दाखवली. ते काल नाशिकमध्ये होते. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी एक कृती केली ज्याची चर्चा चांगलीच रंगलीय. नाशिकमध्ये रावसाहेब दानवे यांना महायुतीच्या जागावाटपाविषयी विचारलं असता त्यांनी आपल्या खिशात असलेली यादीच वाचून दाखवली. त्यामुळे आता या यादीत कोणाची नावं आहेत याविषयी चर्चा रंगलीय.
धुळे, जळगाव, रावेर… Raosaheb Danve ।
“हे कागद आहेत कालचे आहेत, कॅमेरा नको मारुस याच्यावर. धुळे, जळगाव, रावेर, भंडारा, अकोला, गडचिरोली, नाशिक, पालघर, भिवंडी हे सगळ्या महाराष्ट्रातले उमेदवारच आहेत. आमची कालच याबद्दल चर्चा झाली.” असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. ही यादी काही त्यांनी पत्रकारांना दाखवली नाही. पण ही यादी त्यांनी वाचून दाखवली. त्यामुळे महायुतीचे उमेदवार लवकरच जाहीर होतील अशी चिन्हं आता आहेत. तसंच रावसाहेब दानवेंच्या या कृतीची चर्चा नाशिकमध्ये चांगलीच रंगली आहे. पत्रकार नाशिकचा उमेदवार कोण हे विचारत होते पण तेदेखील रावसाहेब दानवेंनी काही सांगितलं नाही.
रावसाहेब दानवे हे भाजपातले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर धुळे, जळगाव, रावेर, भंडारा, अकोला, गडचिरोली, पालघर, भिवंडी या ठिकाणचे उमेदवार ठरले असण्याची शक्यता आहे. मात्र कुठल्या जागा भाजपा लढणार? कुठल्या शिवसेना आणि कुठल्या राष्ट्रवादीकडे येणार याचा सस्पेन्स मात्र कायम आहे.