Maharashtra NDA Alliance। लोकसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपावरून राज्यात एनडीएमधील लढत संपुष्टात येताना दिसत आहे. कारण राज्यातील जागा वाटपाचा फॉर्म्युला आता ठरला असल्याचे सांगण्यात येतंय. यामध्ये भाजप महाराष्ट्रातील 48 पैकी 32 जागांवर निवडणूक शक्यता वर्तवण्यात येतीय. उर्वरित जागांपैकी 10 जागा शिवसेनेला (शिंदे गट) देण्यात येणार आहेत. तर राष्ट्रवादीच्या (अजित पवार गटाच्या) पदरात दोन ते तीन जागा पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.
अजित गटाला बारामती, रायगड, शिरूर किंवा मावळमधून 2 किंवा 3 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी उर्वरित 4 जागांवर फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र, हे उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीतच जागा वाटपाच्या सर्व बाबींवर अंतिम निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येतय. यावेळी अमित शहांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे अर्धा तास चालली. यानंतर दोन्ही नेते सह्याद्री अतिथीगृहातून निघून गेले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी ४५ मिनिटे चर्चा Maharashtra NDA Alliance।
फडणवीस आणि अजित पवार निघून गेल्यानंतर अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी सुमारे ४५ मिनिटे चर्चा केली. प्राप्त माहितीनुसार, या दोन्ही बैठकीत बहुतांश जागांवर सहमती झालीय. मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार गटाला त्यांच्या विजयी क्षमतेच्या जोरावरच जागा मिळणार हे निश्चित झालंय. त्यांना काही जागांची अदलाबदल करावी लागेल आणि गरज पडल्यास त्यांच्या उमेदवाराला कमळ चिन्हावरही निवडणूक लढवावी लागेल.
२४ तासांत दुसऱ्यांदा बैठक Maharashtra NDA Alliance।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. पुन्हा एकदा ते गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. रात्री उशिरा अमित शहा यांनी दोन्ही नेत्यांना जागांची मागणी करताना आक्रमक न होण्याचा सल्ला दिला. दरम्यान, गेल्या २४ तासांतील ही दुसरी बैठक आहे.