नागपूर : विदर्भाचा पहिला डाव ३३८ धावांवर आटोपल्यानंतर पंजाबने रणजी क्रिकेट स्पर्धेत तिस-या दिवसअखेर बिनबाद १३२ धावा अशी मजल मारली आहे. तिस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सनवीर सिंग ५६ आणि शुभमन गिल ७० धावांवर खेळत होता. पंजाबंचा संघ अजूनही २०६ धावांनी पिछाडीवर आहे.
Stumps Day 3: Punjab – 132/0 in 40.1 overs (Shubman Gill 70 off 114, Sanvir Singh 56 off 127) #VIDvPUN @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 27, 2019
दरम्यान दुस-या दिवशी पावसामुळं खेळ होऊ न शकल्यामुळे आणि उद्या सामन्याचा अखेरचा दिवस असल्याने हा सामना अनिर्णित राहिल हे निश्चित आहे.
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ही लढत सुरू आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून विदर्भ संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होत. विदर्भाने पहिल्या डावात गणेश सतीशच्या १४५ , ए. सरवटेच्या ४८, फैज फजलच्या ३४, वाखारेच्या ३४ आणि आर गुर्बानीच्या २७ धावांच्या खेळीच्या जोरावर ११८.२ षटकांत ३३८ धावसंख्येपर्यत मजल मारली.
End Innings: Vidarbha – 338/10 in 118.2 overs (Y R Thakur 8 off 40, R N Gurbani 27 off 38) #VIDvPUN @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 27, 2019
पंजाबकडून बलतेज सिंगने ५९ धावांत ३, अर्शदीप सिंगने ६५ धावांत ३, संदीप शर्माने २०४ धावांत २ तर गुरर्कीतमानने ६ धावा देत १ गडी बाद केला.