MDH EVEREST CASE – फूड रेग्युलेटर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ला एमडीएच आणि एव्हरेस्ट या दोन आघाडीच्या ब्रँडच्या मसाल्यांच्या नमुन्यांमध्ये इथिलीन ऑक्साईडचा कोणताही अंश आढळला नाही. वृत्तसंस्था पीटीआयने सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, 28 मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये नमुने तपासण्यात आले. मात्र, इतर सहा प्रयोगशाळांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. दरम्यान, गेल्या महिन्यात, हाँगकाँग आणि सिंगापूरने गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर FSSAI ने देशभरातून MDH आणि एव्हरेस्टसह सर्व ब्रँडच्या मसाल्यांचे नमुने घेणे सुरू केले होते.
हाँगकाँग, सिंगापूर आणि नेपाळची कारवाई –
एप्रिल महिन्यात, हाँगकाँगच्या सेंटर फॉर फूड सेफ्टी (CFS) ने ग्राहकांना MDH चे मद्रास करी पावडर (मद्रास करीसाठी मसाला मिक्स), एव्हरेस्ट फिश करी मसाला, MDH सांबार मिक्स मसाला पावडर खरेदी न करण्याचा आणि व्यापाऱ्यांनी न विकण्याचा सल्ला दिला होता. एमडीएच करी पावडर मिक्स मसाला पावडर खरेदी करू नका आणि विक्री करू नका असे सांगितले होते. CFS ने म्हटले होते की दोन भारतीय ब्रँड्सच्या विविध प्री-पॅकेज केलेल्या मसाला-मिक्स उत्पादनांच्या नमुन्यांमध्ये कीटकनाशक इथिलीन ऑक्साईड आढळून आले होते. यानंतर सिंगापूर फूड एजन्सीनेही असे मसाले परत मागवण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर अलीकडे नेपाळनेही या दोन कंपन्यांच्या मसाल्यांवर निर्बंध लादले आहेत.
सरकारने कठोर पावले उचलली –
दरम्यान, भारतातील सरकारने मसाल्यांच्या बाबतीत कडकपणा दाखवला. सरकारने मसाल्यांच्या नमुन्यांची स्थानिक पातळीवर चाचणीच केली नाही तर निर्यात केलेल्या मसाल्यांमध्ये ETO (इथिलीन ऑक्साईड) दूषित होण्यापासून रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली. सिंगापूर आणि हाँगकाँगला निर्यात होणाऱ्या मसाल्यांच्या अनिवार्य चाचणीसारख्या इतर उपाययोजनाही सरकारने केल्या आहेत.
दरम्यान, 2022-23 च्या आर्थिक वर्षात 3.7 बिलियनच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात भारताची मसाल्यांची निर्यात एकूण 4.25 अब्ज डॉलर होती. जागतिक मसाला निर्यातीत भारताचा वाटा 12 टक्के आहे.