नागपूर – नागपूर शहरात एका महिलेने आपल्या पतीशी भांडण झाल्यानंतर आपल्या तीन वर्षांच्या मुलीचा खून केला आणि पोलिसांना घटनेची माहिती देण्यापूर्वी मुलीचा मृतदेह चार किमी रस्त्यावर फिरवल्याचा एक अघोरी प्रकार घडला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी ही घटना घडली, असे त्यांनी सांगितले.
आरोपी ट्विंकल राऊत (२३) आणि तिचा पती रामा लक्ष्मण राऊत (२४) हे चार वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात नागपूरला आले.हे दाम्पत्य एका पेपर प्रोडक्ट कंपनीत काम करत होते आणि एमआयडीसी परिसरातील हिंगणा रोडवरील फर्मच्या आवारात एका खोलीत राहत होते.
त्यांचे नाते परस्पर अविश्वासामुळे आणि वारंवारच्या भांडणामुळे बिघडले होते. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास या जोडप्यामध्ये पुन्हा भांडण झाले. त्यांच्यातील वादाने त्यांची लहानगी मुलगी रडू लागली. रागाच्या भरात महिलेने मुलीला घराबाहेर काढले. आणि एका झाडाखाली मुलीचा गळा दाबून खून केला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
त्यानंतर ती या मुलीचा मृतदेह घेऊन ती जवळपास चार किलोमीटर चालली, आणि रात्री ८ च्या सुमारास तिला पोलिसांचे पेट्रोलिंग वाहन दिसले. हे वाहन अडवून तिने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.पोलिसांनीतातडीने या मुलीला रुग्णालयात दाखल केले जेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे.