Virat Kohli & IPL Record : आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात विराट कोहली 8,000 धावा पूर्ण करणारा आयपीएल इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने राजस्थानविरुद्धच्या सामन्यातील आपल्या डावात 30 धावा करून हा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
कोहलीने आपल्या 252 व्या आयपीएल सामन्यात 8 हजार धावांचा आकडा पूर्ण केला आहे. 8 हजार धावा पूर्ण करताना कोहलीने 8 शतके आणि 55 अर्धशतकेही झळकावली आहेत. एलिमिनेटर सामन्यात कोहलीने 24 चेंडूत 33 धावांची खेळी केली.
कोहलीच्या आसपासही कोणी नाही…
विराट कोहलीचा आयपीएलमध्ये इतका दबदबा आहे की आतापर्यंत 7,000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो एकमेव खेळाडू आहे. या लीगच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत शिखर धवन दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याच्या सध्या 222 सामन्यांमध्ये 6,769 धावा आहेत. म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या कोहली आणि धवन यांच्यात 1,235 धावांचा मोठा फरक आहे.