लॉकडाऊनच्या काळात बॉलीवूड सिलेब्स सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात आणि आपले फोटो-व्हिडिओ शेअर करत त्यांना अपडेट्स देत असतात. दरम्यान, आलिया भट्टने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, जो चर्चेचा विषय बनला आहे.
वास्तविक, आलिया भट्ट लहान केसांमध्ये दिसली आहे. आलियाने रविवारी हा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये आलियाने असेही सांगितले आहे की, तिच्या जवळच्या कुणीतरी तिचे केस घरीच कापले आहेत. तथापि, आलियाने या व्यक्तीबद्दल काहीही सांगितले नाही. ही तिची बहीण शाहीन भट्ट किंवा प्रियकर रणबीर कपूर देखील असू शकतो. त्यामुळे आलियाचे केस कोणी कापले याचा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात आलिया आणि रणबीर एकत्र राहत आहेत. अलीकडेच हे दोघे ऋषि कपूर यांच्या तेराव्या विधीवेळी एकत्रित दिसले होते. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, रणबीर आणि आलिया त्यांच्या आगामी “ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, मौनी रॉय, डिंपल कपाडिया आणि नागार्जुन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.