Canada Squad For T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिज आणि युनायटेडमध्ये आगामी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ साठी कॅनडाने आपला संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये साद बिन जफरकडे टीमची कमान सोपवण्यात आली आहे. कॅनडाने 15 खेळाडूंच्या संघात कोणाचा समावेश केला आहे ते जाणून घेऊया.
कॅनडाचा संघ या स्पर्धेत दमदार कामगिरी करू शकतो. कारण संघाने T20 विश्वचषकासाठी आपल्या संघात दमदार खेळाडूंचा समावेश केला आहे. कॅनडाला या स्पर्धेत मोठ्या संघांविरुद्ध चांगली कामगिरी करण्याची आशा आहे. कर्णधार साद व्यतिरिक्त कॅनडात फलंदाज आरोन जॉन्सन आणि वेगवान गोलंदाज खलीम सनासारखे खेळाडू आहेत, ज्यांच्याकडून महत्त्वाच्या भूमिकांची अपेक्षा आहे.
🚨 TEAM CANADA Squad for the @icc @t20worldcup 🚨
Let’s go! 🇨🇦#t20worldcup #icc #cricketcanada pic.twitter.com/0CRjrMkwOL
— Cricket Canada (@canadiancricket) May 1, 2024
T20 विश्वचषक 2024 साठी कॅनडाचा संघ : साद बिन जफर (कर्णधार), आरोन जॉन्सन, डिलन हेलिगर, दिलप्रीत बाजवा, हर्ष ठाकरे, जेरेमी गॉर्डन, जुनैद सिद्दीकी, कलीम सना, कंवरपाल तथगुर, नवनीत धालीवाल, निकोलस किर्टन, परघट सिंग, रविंदरपाल सिंग, रायनखान पठाण आणि श्रेयस मोहम्मद.
राखीव – तजिंदर सिंग, आदित्य वर्धराजन, अममार खालिद, जतिंदर माथरू आणि परवीन कुमार.