फलटण – फलटण तालुक्यात करोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने फलटण शहर व तालुक्यातील नागरिकांनी आता अधिक सतर्क व काळजीपूर्वक वागण्याची गरज असूनbप्रशासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे, असे आवाहनविधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले
आहे. संपूर्ण देशात व महाराष्ट्रात लॉकडाऊन असून प्रशासनाने विविध आदेश जारी केले आहेम. त्यांची तंतोतंत अंमलबजावणी नागरिकांकडून होताना दिसत नाही.
फलटण तालुक्यातील जनतेने प्रशासनाच्या आदेशांचे तंतोतंत पालन करावे, अशी सूचना मी यापूर्वी वारंवार दिली तरी फलटण शहरातील गल्लीबोळांमध्ये व तालुक्यातील काही भागांमध्ये युवक एकत्र येऊन विनाकारण गप्पा मारताना व फिरताना दिसत आहेत. आता आपल्या तालुक्यात करोना संसर्ग झालेली महिला आढळली आहे. त्यामुळे आपल्याला पूर्वीसारखे गाफील राहून चालणार नाही. या विषाणूचा संसर्ग झपाट्याने व गुणाकार पद्धतीने पसरतो.
फलटण तालुक्यातील प्रशासनाशी मी संपर्क साधून आहे. संपूर्ण तालुक्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. शहराकडे व तालुक्याच्या हद्दीकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात यावेत, असे आदेश मी प्रशासनाला दिले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक करून घराघरात जाऊन स्क्रीनिंग करावे. ज्या नागरिकांमध्ये सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळतील, त्यांच्यावर वैद्यकीय पथकांमार्फत विशेष लक्ष दिले जावे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, जीवनाश्यक वस्तू लोकांना घरपोच देण्याची व्यवस्था करावी. फलटण तालुक्यातील जनतेने या सूचनांचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. मीच माझा, माझ्या कुटुंबाचा, गावाचा रक्षक या नात्याने काम करावे, असे आवाहन रामराजे यांनी केले आहे.