मुंबई – सुपर स्टार रजनीकांत असा साऊथचा सुपरस्टार आहे, रजनीकांतची क्रेझ देशातच नव्हे जगभरात आहे. त्याचे चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात.
त्याचा लूक, स्टाइल आणि अभिनय पाहून चाहते थिएटरमध्ये जोरदार टाळ्या वाजवतात. रजनीकांतबद्दल अशाच काही बातम्या येत आहेत ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसू शकतो. नुकतीच बातमी आली आहे की, लोकेश कनगराजसोबत रजनीकांत जो चित्रपट करत आहेत तो कदाचित त्यांचा शेवटचा चित्रपट असू शकतो.
नुकतीच प्रसिद्ध तमिळ चित्रपट निर्माते मायस्किन यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. रजनीकांत त्यांच्या १७१व्या चित्रपटासाठी विक्रम चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कनागराज यांच्यासोबत दिसणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हा चित्रपट त्यांचा शेवटचा चित्रपट असू शकतो असे त्यांनी सांगितले. याची पुष्टी झालेली नसली तरी. त्याने सांगितले, ‘रजनीकांतने स्वतः लोकेशशी संपर्क साधला होता आणि त्याच्यासोबत काम करण्यात रस दाखवला होता.’ विक्रमसारखा चित्रपट बनवणाऱ्या आणि लिओ बनवणाऱ्या लोकेश कनागराजसोबत रजनीकांतची जुगलबंदी पाहण्यासारखी असेल.
रजनीकांतच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे तर, त्यात जेलर आणि लाल सलाम यांचा समावेश आहे. नेल्सन जेलरचे दिग्दर्शन करत असून रजनीकांतसोबत शिवा राजकुमार, तमन्ना आणि रम्या कृष्णन दिसणार आहेत. तर लाल सलाममध्ये रजनीकांतचा कॅमिओ आहे. त्यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीत जवळपास पाच दशके झाली आहेत.