मुबई – IPL 2023 चा 66 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात धर्मशाला येथे होणार आहे. याच मैदानावर झालेल्या गेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा दिल्ली कॅपिटल्सकडून १५ धावांनी पराभव झाला होता, तर राजस्थान रॉयल्सला आरसीबीविरुद्ध ११२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
सध्या राजस्थान रॉयल्स 12 गुणांसह सहाव्या स्थानावर असून पंजाब किंग्ज 12 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत, परंतु दोन्ही संघ त्यांचा शेवटचा लीग स्टेज सामना जिंकून प्लेऑफच्या आशा कायम ठेवण्यासाठी भिडणार आहेत. यामुळे आज होणार सामना दोन्हही टीमसाठी खूपच महत्वाचा असणार आहे.
काय सांगत आता पर्यतच रेकॉर्ड
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आतापर्यंत 25 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी राजस्थान रॉयल्सने 14 सामने जिंकले आहेत आणि पंजाब किंग्सने 11 सामने जिंकले आहेत.
अशी असेल आजच्या सामन्यासाठी खेळपट्टी
राजस्थान रॉयल्स पंजाब किंग्जविरुद्धच्या महत्वाच्या लढतीत कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. धर्मशालाच्या पीचबद्दल बोलायचे झाले तर येथे गोलंदाजांना खूप मदत मिळते. छोट्या बाऊंड्रीजमुळे फलंदाज मोठे फटके मारताना दिसतील. त्यामुळे या मॅचमध्ये रन्सचा पाऊस पडणार आहे.
अशी असू शकते टीम
पंजाब किंग्स – शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, सॅम करण, लियाम लिव्हिंगस्टोन, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), राहुल चहर, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, कागिसो रबाडा.
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), देवदत्त पडिककल, केएम आसिफ, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.