Rajinikanth And Shah Rukh Khan| अभिनेता रजनीकांत आणि बॉलीवूडचा किंग शाहरुख खान एकत्र पाहायला मिळणार आहेत. रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘थलाईवर 171’ मध्ये हे दोघेही कलाकार एकत्र दिसणार आहे. यापूर्वी शाहरुख आणि रजनीकांत रा-वन चित्रपटात एकत्र दिसले होते. रा-वनमध्ये रजनीकांतचा कॅमिओ होता आणि आता शाहरुख खान ‘थलाईवर 171’ मध्येही कॅमिओ करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दिग्दर्शक लोकेश कनागराज आता रजनीकांतसोबत पहिल्यांदाच चित्रपट बनवणार आहे. आता या चित्रपटात शाहरुख खान कॅमिओ करताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे. असे झाले तर रजनीकांत, शाहरुख खान आणि लोकेश कनगराज हे तिघेही बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवू शकतात. मात्र, याबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. २२ एप्रिलला टीझर रिलीज होणार असून चाहत्यांना हे सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. Rajinikanth And Shah Rukh Khan|
या सिनेमाचं टायटल थलायवर 171 नसून वेगळं असणार आहे. टायटलवर अजूनही विचार सुरु आहे. चाहत्यांचं सिनेमाचं नाव आणि टीझर याकडे लक्ष लागलं आहे. प्री प्रोडक्शनचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. रजनीकांत आणि लोकेश दोघंही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. Rajinikanth And Shah Rukh Khan|
मोहन, विजय सेतुपति आणि शाहरुख खान ‘थलायवर 171’चा भाग असणार आहेत. या सिनेमात मोहन खलनायकाच्या भूमिकेत असणार आहे. थलायवर 171 मध्ये शाहरुख खानचीही मुख्य भूमिका असणार आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप त्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. मात्र या चित्रपटाची चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचा:
‘मला लोखंडी रॉडने मारलं अन्…’वर्ध्याचे भाजपा उमेदवार रामदास तडस यांच्यावर सूनेचे गंभीर आरोप