Rahul Gandhi Wrestlers Meeting : देशात सध्या कुस्तीपटूंच्या वादाचा मुद्दा चांगलाच चिघळला आहे. भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पुन्हा एकदा कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत. कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेत देशाला धक्का दिला. तर साक्षीपाठोपाठ बजरंग पुनिया आणि विनेश फोगाटने आपापले पुरस्कार परत करणार असल्याची घोषणा केली. या सर्व गोंधळात आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हरियाणामध्ये जाऊन कुस्तीपटूंची भेट घेतली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील छारा गावात पोहोचले. याठिकाणी राहुलने वीरेंद्र आर्य आखाड्यात जाऊन बजरंग पुनिया आणि इतर पैलवानांची भेट घेतली. छारा हे पैलवान दीपक पुनिया यांचे गाव. दीपक आणि बजरंग यांनी त्यांच्या कुस्ती कारकिर्दीला वीरेंद्र आखाड्यापासून सुरुवात केली. त्याठिकाणचाच आखाड्यातील राहुल गांधींचा फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ते कुस्तीपटूंसोबत बसलेले दिसत आहेत.
#WATCH | Haryana: Congress MP Rahul Gandhi reaches Virender Arya Akhara in Chhara village of Jhajjar district and interacts with wrestlers including Bajrang Poonia. pic.twitter.com/j9ItihwVvP
— ANI (@ANI) December 27, 2023
दरम्यान, राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांनी बजरंग पुनिया यांना विचारले की काँग्रेस नेते इथे का आले? त्यावर उत्तर देताना, पुनियाने सांगितले की, ते आमची दैनंदिन कुस्तीची दिनचर्या समजून घेऊन पाहण्यासाठी आले आहे. त्यांनी आमच्यासोबत कुस्तीही खेळली आणि व्यायामही केला. पुढे बोलताना पुनियाने, राहुलनेही त्याच्यासोबत कुस्ती खेळली. एका पैलवानाचा दिनक्रम पाहण्यासाठी तो आमच्या ठिकाणी आला. मात्र, पुनियाने राहुल गांधींसोबत नेमकी काय चर्चा झाली हे सांगितले नाही.
राहुलने ज्या छारा गावात भेट दिली ते दीपक पुनियाचे गाव आहे, ज्याने २०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. बजरंग पुनिया, दीपक पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक हे कुस्तीपटू आहेत ज्यांनी ब्रिजभूषण सिंगला विरोध केला आहे. संजय सिंगची निवड झाल्यावर कुस्तीपटूंनी त्याला विरोधही केला होता. कुस्तीपटूंनी सांगितले की संजय सिंगच्या नियुक्तीमुळे WFI मध्ये सुधारणा होणार नाही, कारण ते ब्रिजभूषण यांच्या जवळचे आहेत. त्याच वेळी, WFI चे नवीन अध्यक्ष संजय सिंग यांच्यामार्फत या वर्षाच्या अखेरीस अंडर-15 आणि अंडर-20 कुस्ती स्पर्धा जाहीर केल्यानंतर, क्रीडा मंत्रालयाने WFI ला निलंबित केले. कुस्ती स्पर्धेची घोषणा करताना नियम ध्यानात घेतले नसल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नुकतीच WFI ची नवीन संघटना रद्द केली. एवढेच नव्हे तर नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह यांनाही निलंबित करण्यात आले. संजय सिंह हे भाजप खासदार आणि WFI चे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे मानले जातात. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.