Salman Khan Birthday : बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान 27 डिसेंबरला त्याचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या सलमान खान त्याच्या ‘टायगर 3’ आणि ‘बिग बॉस 17’ या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. सलमान खानने त्याच्या कारकिर्दीत बराच पल्ला गाठला आहे, पण वैयक्तिक आयुष्यात तो अजूनही मागे आहे. या वयातही सलमान खानने लग्न केलेले नाही. प्रत्येकजण त्याच्या लग्नावरून चर्चा करत असतात. चाहते त्याला नेहमीच प्रश्न विचारतात ‘तुझे लग्न कधी होणार?’
अशात, एका जुन्या मुलाखतीत सलमान खान म्हणाला होता की, ‘लग्न ही खूप मोठी गोष्ट आहे, ज्यामध्ये लाखो-करोडो रुपये खर्च होतात. सलमानने सांगितले की, तो हा खर्च करू शकत नाही, त्यामुळे तो लग्न करत नाही. ‘सुलतान’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सलमान खानने लग्नाच्या बाबतीत स्वत:ला दुर्दैवी म्हटले होते.’
सलमान खान म्हणाला होता की, तो लग्नासाठी उत्सुक आहे, पण तो समोरच्याच्या हो ची वाट पाहतो. सलमान म्हणाला की, लग्न करणे ही पुरुषाची नाही तर स्त्रीची इच्छा आहे.
सलमान खानने केवळ एक-दोन नव्हे तर मनोरंजन क्षेत्रातील अनेक अभिनेत्रींना डेट केले. सलमान खानने पहिल्यांदा सोमी अलीला डेट केले होते. सोमी एक अमेरिकन-भारतीय अभिनेत्री आहे, तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. सलमान आणि सोमी गंभीर नात्यात होते पण दोघांनीही लग्न केले नाही.
दरम्यान, सोमी अलीनंतर सलमान खानने अभिनेत्री संगीत बिजलानीला डेट केले. त्यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली होती. आजही सलमान हा संगीताचा चांगला मित्र आहे. ज्याच्यासोबत सलमान खानच्या अफेअरची सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे ऐश्वर्या राय. त्यांचे नाते कोणापासून लपलेले नव्हते आणि त्यांच्या ब्रेकअपच्या किस्सेही प्रसिद्ध आहे. सलमान खान कतरिना कैफसोबतही सिरीयस रिलेशनशिपमध्ये होता, पण त्यांचे नातेही फार काळ टिकले नाही. सध्या सलमानचे नाव रोमानियन मॉडेल युलिया वंतूरसोबत जोडले गेले आहे. मात्र, या नात्याबाबत दोघांनीही कधीही मौन सोडलेले नाही.