कोट्यधीश आमदार संग्राम जगताप कर्जबाजारी!

नगर – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांनी अर्ज भरतेवेळी दाखलकेलेल्या शपथ पत्रानुसार मागील 5वर्षाच्या कालावधीतील उत्पन्न 2013-14 मध्ये 10 लाख 58 हजार 529 रुपये एव्हढे होते. तर 2017-18 च्या आर्थिक वर्षात ते 47,06.213 इतके झाल्याचे सांगितले आहे तसेच त्यांच्या पत्नी शितल जगताप यांचे 2015-16 या वर्षीचे वार्षिक उत्पन्न 6 लाख 43 हजार 916 इतके होते. तर 2017-18 या आर्थिक वर्षात ते 5 लाख 662 रुपये इतके झाले. या कमाईत शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा मोठा आहे. संग्राम जगताप यांच्याकडे शंभर ग्रॅम सोने असून त्याची रक्कम 3 लाख 17 हजार 970 रुपये एवढी आहे. तर शितल जगताप यांच्याकडे 300 ग्रॅम सोने आहे त्याची अंदाजे किंमत 9 लाख 53 हजार 910 रुपये एवढी आहे. तसेच संग्राम जगताप आणि शितल जगताप यांच्या नावे प्रत्येकी 5 लाख रुपयांचा विमा असून, विविध बॅंकांतील ठेवी मिळून संग्राम जगताप यांच्या नावे दोन कोटी 25 लाख 65 हजार 390 रुपये 99 पैसे असून शितल जगताप यांच्या नावे 42 लाख 72 हजार 232 रुपये तसेच मुलगी परमेश्‍वरी हिच्या नावे 5 हजार रुपये दाखविले आहे.

संग्राम जगताप यांच्याकडील स्थावर मालमत्तेत नालेगाव सर्व्हे नं. 41/ब मध्ये 12.5 टक्के हिस्सा, वाळवणे, पारनेर येथील गट नं.221/1+221/2 मध्ये 50 टक्के हिस्सा, बनप्रिंप्री श्रीगोंदा गट नं. 104, 105, 106, 108, बनप्रिंप्री श्रीगोंदा गट नं. 345/1, 345/2, वाटेफळ येथील गट नं. 163/1 मधील 25 टक्के हिस्सा, साकत खुर्द गट नं.55 मध्ये 25 टक्के हिस्सा आणि काकडी कोपरगांव गट. नं.348 मध्ये 20 टक्के हिस्सा तर शितल जगताप यांच्या नावे साकत खुर्द गट नं. 55 मध्ये 25 टक्के हिस्सा, बनपिंप्री श्रीगोंदा गट नं. 101/1, बनपिंप्री श्रीगोंदा गट नं. 280 मध्ये 50 टक्के हिस्सा, बनपिंप्री श्रीगोंदा गट नं. 93+94/1 मधील 50 टक्‍के हिस्सा, बनपिंप्री श्रीगोंदा गट नं. 55, 93, 94/1, 152 मध्ये 50 टक्के हिस्सा असून त्याची सध्याची किंमत संग्राम जगताप यांच्या नावे 16 कोटी 98 लाख नऊ हजार 146 रुपये तर शितल जगताप यांच्या नावे 3 कोटी 82 लाख 1066 एवढी मालमत्ता आहे. संग्राम जगताप यांना शितल जगताप यांच्याकडून 5 लाख 86 हजार 197 रुपये, हॉटेल राज रिजेन्सी यांच्याकडून 45 टक्के हिश्‍यापोटी 17 लाख 30 हजार रुपये, हॉटेल राजयोग 30 टक्के हिश्‍यापोटी 66 लाख 57 हजार 65 रुपये 58 पैसे, हॉटेल राजश्री 45 टक्के हिश्‍यापोटी 39 लाख 83 हजार 419 रुपये, हॉटेल राजनंद 33.33 टक्के हिश्‍यापोटी 14 लाख 75 हजार, तावरे पेट्रोलियम 49 टक्के हिश्‍यापोटी 13 लाख 46 हजार 312 रुपये 31 मार्च 2018 अखेर येणे आहे.

आ. संग्राम जगताप यांच्या नावावर 1 इनोवा कार रु.22 लाख 70 हजार 856 आणि एक होडा कार 26 लाख 65 हजार 990 रुपये किंमतीच्या गाड्या असून, शितल जगताप यांच्याकडे फोर्स ही 6 लाख रुपयांची तर यामाहा 40 हजार रुपये किंमतीची आणि टोयटो कार 19 लाख 99 हजार 900 रुपये किंमतीच्या गाड्या आहेत. रेसिडेन्शिअल आणि शेत जमिनीचा हिश्‍यापोटी सहा लाख 77 हजार 846 आणि दोन लाख 67 हजार 931 रुपयांची त्यांची मिळकत आहे.
संग्राम यांच्या नावे पंजाब नॅशनल बॅंक घोगरगाव शाखेत तीन लाख 34 हजार 564 रुपये 25 पैशाचे तसेच विविध कार्यकारी सोसायटीपाच लाख 26 हजार 310 रुपये बॅंक ऑफ इंडियाचे 2 लाख 18 हजार 411 रुपये 90 पैसे, बॅंक ऑफ इंडिया सहा लाख 70 हजार 668 रुपये 87 पैसे, बॅंक ऑफ इंडिया े 124 रुपये 82 पैसे आदी रकमेची शेतकी कर्ज तर स्टेट बॅंक ऑफ इंडियातून 16 लाख 98 हजार 441 रुपये, मर्चंट को-ऑप. बॅंक 8 लाख 6 हजार 937 रुपयांचे वाहन कर्ज, मर्चंट को.ऑप. बॅंकमध्ये हॉटेल राज रिजन्सीचे 92 लाख 59 हजार 727 रुपये पैकी 45 टक्के हिश्‍यापोटी 41 लाख 66 हजार 877 रुपये 15 पैसे, मर्चंट को.ऑप. बॅंक हॉटेल राज रिजन्सीच्या 45 टक्के हिश्‍यापोटी 6 लाख 49 हजार 258 रुपये 65 पैसे, मर्चंट को.ऑप. बॅंक हॉटेल राज रिजन्सीच्या 45 टक्के हिश्‍यापोटी 11 लाख 34 हजार 287 रुपये 10 पैसे, मर्चंट को.ऑप. बॅंक हॉटेल राजयोग मधील 30 टक्के हिश्‍यापोटी 8 लाख 83 हजार 758 रुपये 70 पैसे, मर्चंट को.ऑप बॅंक तावरे पेट्रोलियम मधील एकूण 50 टक्के हिश्‍यापोटी 17 लाख 12 हजार 881 रुपये 27 पैसे आणि इतर कर्जापोटी घेतलेल्या एकूण 2 कोटी 91 लाख 70 हजार 584 रुपये 71 पैसे एवढी रक्कम कर्जाऊ घेतली आहे. तर शितल जगताप यांनी बॅंक ऑफ इंडियोतून 2 लाख 21 हजार 246 रुपये, बॅंक ऑफ इंडिया तून 7 लाख 11 हजार 848 रुपये 10 पैसे, बॅंक ऑफ इंडियातून 1 लाख 82 हजार 155 रुपये 17 पैसे शेतकी कर्ज, मर्चंट को.ऑप बॅंकेतून 16 लाख 77 हजार 102 रुपये वाहन कर्ज आणि संग्राम अरूण जगताप यांच्याकडून 5 लाख 86 हजार 197 रुपये अशी एकूण 33 लाख 78 हजार 548 रुपये 27 पैसे देणे दाखविले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.