पुणे कॅन्टोन्मेन्टची “कॉस्मोपॉलिटन स्टाइल’ यंदाही कायम

पुणे – कॅन्टोन्मेन्ट विधानसभा मतदार संघ हा कायमच “कॉस्मोपॉलिटन स्टाइल’ दाखवणारा मतदारसंघ मानला जात आहे. कोणत्या एका पक्षाचा हा कधीच बालेकिल्ला होऊ शकला नाही. सध्या येथे वर्चस्व भाजपचे आणि आमदार भाजपचा असला, तरी या आधी माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या कार्यकाळात तो कॉंग्रेसच्या ताब्यात होता. त्यावेळी रमेश बागवे हे तेथून आमदार म्हणून दोनदा निवडून आले आणि त्यांना गृहराज्यमंत्रीपदही मिळाले होते.

सन 2014च्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून सुमारे 14-15 हजार मतेच अनिल शिरोळे यांना पडली होते. मात्र, यंदा त्यात तब्बल साडेचारपट वाढ होऊन बापट यांना 67 हजार 177 मते पडली. त्यामुळे मागच्यावेळपेक्षा ही मते जास्त असली, तरी एकूणात ती कमी आहेत. भाजपचे आमदार दिलीप कांबळे हे या मतदारसंघातून निवडून आले तरी येत्या विधानसभा निवडणुकीत हा गड भाजपच राखण्याची शक्‍यता लोकसभेच्या मताधिक्‍यावरून प्रथमत: वाटत आहे. हा भाग कॉस्मोपॉलिटन असल्याने आणि कॉंग्रेस नगरसेवकांची संख्याही येथे जास्त असल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार मोहन जोशी यांना पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये येथून बापट यांच्यापेक्षा लीड मिळाला होता. त्यांना या मतदारसंघात 54 हजार 444 मते पडली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×