पुणे(प्रतिनिधी) : शहरात करोनाचा प्रसार वाढत असून आरोग्य यंत्रणा कोलमडून पडण्याच्या स्थितीत आहे. अशातच आता महापालिकाच सोशल डिस्टन्स नियमांना हरताळ फसत असल्याचे समोर आले आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1226627471010289/
महापालिकेची मागील वर्षाची बिले सादर करण्यासाठी पालिकेच्या लेखापाल विभागात एकाच वेळी दोनशे ते तीनशे ठेकेदारांनी गर्दी केल्याचे शुक्रवारी सायंकाळी दिसून आले. बिले सादर करण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्याचे निरोप ठेकेदारांना पालिकेतील अधिकरी तसेच अभियंत्याकडून देण्यात आले होते. त्यामुळे ही गर्दी झाली होती.