तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या १९ वर
बेल्हे(प्रतिनिधी):- औरंगपूर (ता. जुन्नर) येथील एका ५८ वर्षे पुरुषाचा कोविडं १९ या आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती गावचे तलाठी विजय फलके यांनी दिली. सदर व्यक्ती औरंगपूर गावामध्ये १८ मे रोजी मुंबईवरून आली होती. कोरोना ची लक्षणे दिसत असल्याने या रुग्णाला २७ मे रोजी पुणे येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
गुरुवार (दि.२८) रात्री उशिरा या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला व शुक्रवारी पहाटे सदर व्यक्ती मृत्यू झाली. त्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत असून औरंगपूर गाव व आजूबाजूच्या पाच किलोमीटर परिसरातील गावे यामध्ये पारगाव निमगाव सावा हे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
सध्या तालुक्यात धोलवड :-३,सावरगाव:-५,मांजरवाडी:-२,खिलारवाडी:१,पारुंडे:-२,आंबे गव्हाण:-२, डिंगोरे:-१,ढालेवाडी तर्फे मिन्हेर:- १,औरंगपूर:-१,विठ्ठलवाडी वडज येथील १ असे एकूण १९ रुग्ण नोंद असून डिंगोरे येथील रुग्ण बरा झाला आहे.
औरंगपूर येथील रुग्ण उपचारा दरम्यान मृत झाला असल्याने गावांमध्ये कोणत्याही व्यक्तीला पुढचे २८ दिवस येण्यास व जाण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आले असल्याचे तलाठी विजय फलके यांनी सांगितले. सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन कोविडं-१९ च्या तपासण्या करण्याचं काम प्रशासन करत आहे.
जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे,गट विकास अधिकारी विकास दांगट, नारायणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी शुक्रवारी तात्काळ गावाला भेट देऊन सुरक्षिततेच्या सूचना दिल्या.