पुणे – कोल्हापुरातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. रात्री उशीरापर्यंत शहरातील घडमोडींवर लक्ष ठेवण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त कर्णिक यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत.
कोल्हापुरात बुधवारी (7 जून) तणाव निर्माण झाला. दंगलसदृश परिस्थितीमुळे कोल्हापुरात जनजीवन विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. पोलीस ठाण्यातील प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. समाजमाध्यमातील संदेशांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.