pune news – पुणे पोलिसांनी तडीपार केल्यानंतर रायगड जिल्हयात रहायला गेलेल्या गुन्हेगाराने तेथेही आपले गुन्हयांचे सत्र सुरुच ठेवले. त्याने तडीपारीच्या कलावधीत माणगाव आणि महाड येथे घरफोडीचे गुन्हे केले. यानंतर तेथून तो फरार होऊन पुन्हा बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झाला. त्याला बंडगार्डन पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले.
बाळू रंगप्पा म्हेत्रे उर्फ चुन्या ( रा – ताडीवाला ) असे अटक गुन्हेगाराचे नाव आहे. तो रायगड जिल्हयातील चार घरफोडीच्या गुन्हयात फरार होता. पुणे पोलिसांनी तडीपार केल्यानंतर त्याने हे घरफोडीचे गुन्हे केले आहेत. तडीपारीच्या कलावधीत तो रायगड जिल्हयात रहायला गेला होता. तेथील पोलिसांचा ससेमीरा मागे लागल्यावर तो पुण्यात दाखल झाला.
दरम्यान पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना त्याची खबर मिळाली. त्यानूसार ताडीवाला रस्ता येथील पाच बिल्डंग येथे त्याला ताब्यात घेण्यात आले.
हडपसर पोलीस ठाण्यात त्याच्यावर खून आणि खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हे दाखल आहेत. परिसरात दहशत असल्याने त्याला तडीपार करण्यात आले होते. त्याच्या विरुध्द माणगाव आणि महाड पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील , उपायुक्त परिमंडळ स्मार्तना पाटील , सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सुर्वे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र गावडे, अंमलदार सुधीर घोटकुले, अनिल कुसाळकर, ज्ञाना बडे, संजय वणवे, शिवाजी सरक, मनोज भोकरे विशाल जाधव यांचे पथकाने के