pune news : गेल्या तीन दिशकात शहराच्या वाढत्या नागरीकरणा सोबतच महापालिकेच्या पाणी पुरवठयाच्या (Pune water) जवळपास सर्व योजनांचे प्रमुख तसेच शहराच्या पाणी पुरवठा विभागाची सर्वाधिककाळ जबाबदारी सांभाळणारे महापालिकेच्या पथ विभागाचे विद्यमान प्रमुख व्ही. जी कुलकर्णी (V. G. Kulkarni) मंगळवारी सेवा निवृत्त झाले.
महापालिकेत तब्बल 30 वर्षे त्यांनी सेवा बजाविली त्यात तब्बल 26 वर्षे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात काम केले आहे. विशेष म्हणजे, शहरातील सर्व प्रमुख पाणी योजना कुलकर्णी यांच्या काळातच मार्गी लागल्या आहेत. व्हि. जी. कुलकर्णी हे 1994 मध्ये महापालिकेच्या सेवेत दाखल झाले.
या कालावधीत खडकवासला ते पर्वती आणि पर्वती ते लष्कर जलकेंद्र बंद पाईप योजना, भामा आसखेड पाणी पुरवठा योजना, चोवीस तास पाणी पुरवठा योजनांसह वारजे, वडगाव पाणी पुरवठा केंद्र तसेच सांडपाणी शुध्दीकरण केंद्र, पर्वती ते लष्कर बंद जलवाहीनी, शहरातील पाणी पुरवठयाच्या वाहिन्यांचे मॅपिंग, जायका प्रकल्प या मध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. मागील चार वर्षांपासून त्यांच्याकडे पथ विभागाचा कार्यभार सांभळला.