पुणे – पर्यटकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात आणि त्यातून पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे यंदा पर्यटकांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पर्यटकांचे मनोरंजन व्हावे, यासाठी महामंडळाच्या वतीने शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्याच्या दिवशी सांस्कृतिक आणि अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याशिवाय रिसॉर्टच्या आसपासची ठिकाणे, किल्ले तसेच अन्य पर्यटन ठिकाणे पाहता यावीत, यासाठी टूर पॅकेजस उपलब्ध करून दिली आहेत. या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे, असे पुणे विभागाचे व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले.