लंडन – फलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्याच्या बळावर बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेचा 21 धावांनी पराभव करत स्पर्धेतील पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 6 बाद 330 धावांची मजल मारत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 331 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना आफ्रिकेला 8 बाद 309 धावांचीच मजल मारता आली.
BANGLADESH WIN BY 21 RUNS!
What a day for the Tigers – they hit their highest-ever ODI total before some impressive bowling saw them home 👏 👏 👏 #SAvBAN SCORECARD 👇 https://t.co/6wY1jYPAUQ pic.twitter.com/Fd8DlQwLD9
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 2, 2019
विजयासाठी 331 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने सावध सुरुवात केली. सलामीवीर क्विंटन डि कॉक आणि डिन मार्करम यांनी 49 धावांची सलामी दिली. रहीमने डि कॉकला धावबाद करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. यानंतर मार्करम आणि फाफ ड्यु प्लिसिसने दुसऱ्या विकेटसठी 51 धावांची भागिदारी रचल्यानंतर मार्करम 45 धावांवर बाद झाला.
मार्करम बाद झाल्यानंतर ड्यु प्लिलिसने मिलरच्या साथीन आफ्रिकेला 150 च्या जवळ पोहचवले. यावेळी ड्यु प्लिसिस 62 धावांवर बाद झाला. यानंतर आफ्रिकेचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत असताना मिलर 38 धावा करुन बाद झाला. तर, डसेनही 41 धावा करुन बाद झाला. यानंतर ड्युमिनी 45 धावांची खेळी करुन परतल्याने आफ्रिकेला 309 धावांचीच मजल मारता आली.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचे सलामीवीर तमिम इक्बाल आणि सौम्य सरकारने संघाला 60 धावांची सलामी दिल्यानंतर ठरावीक अंतराने बांगलादेशचे दोन्ही सलामीवीर परतले. यानंतर आलेल्या शाकिब अल हसन आणि मुश्फिकुर रहिमयांनी संघाचा डाव सावरत बांगलादेशला द्विशतकी मजल मारुन दिली. त्याबरोबरच दोघांनीही शतकी भागिदारी देखील पूर्ण केली. हे दोघे जण बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारुन देणार असे वाटत असतानाच शाकिब 75 धावा करुन परतला.
यानंतर मुश्फिकुर रहिम देखील 78 धावा करुन परतल्यानंतर आलेल्या महमुद्दाल्लाह आणि मोसद्दक हुसैनयांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांची चौफेरे धुलाई करत बांगलादेशला 300 धावांची मजल मारुन दिल्यानंतर मोसद्दक हुसैन 26 धावा करून परतला. यानंतर मोहमदुल्लाहने बांगलादेशला 330 धावांची मजल मारुन दिली.
संक्षिप्त धावफलक –
बांगलादेश 50 षटकांत 6 बाद 330 (मुश्फिकुर रहिम 78, शाकिब अल हसन 75, इम्रान ताहिर 2-57) दक्षिण आफ्रिका 50 षटकांत 8 बाद 309 (फाफ ड्यु प्लेसिस 65, ड्युमिनी 45, मुस्तफिझुर रेहमान 3-67)