29 ग्रामपंचायतींच्या सरपंच, भाजपला एकही जागा नाही
भोर : भोर तालुक्यातील 54 ग्रामपंचायतींच्या जाहीर झालेल्या निवडणुकांत 24 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या, तर 29 ग्रामपंचायतींच्या निवाडणुकांचा निकाल आज (दि. 20) निवडणुक निर्णय अधिकारी तथा भोरचे प्रांत राजेंद्र कचरे आणि सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांनी जाहीर केला. या निकालात महाविकास आघाडीच्या (कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना) उमेदवारांनी बाजी मारली असून, भाजपला एकाही ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवता आली नाही. यांच्या ताब्यात ग्रामपंचायती आल्या आहेत.
थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच पुढीलप्रमाणे ; अंगसुळे – राणी शशिकांत किरवे, कर्नावड- सोनाली अविनाश राजीवडे, शिरवली तर्फे भोर – कोमल अमित झांजले, ब्राह्मणघर – रंजना सीताराम धुमाळ, पसुरे – प्रवीण विलास धुमाळ, कारी – सतीश रामचंद्र ढेबे, येवली – कल्पना आनंदा खंडाळे, सांगवी हिमा – संदीप सुदाम शेलार, राजघर – संगीता गणेश पडवळ, निगुडघर – मंगल मारुती कंक, आंबेघर – अश्विनी संदीप खोपडे, बारे खुर्द – सविता संदीप गायकवाड, सांगवीभिडे – सविता शत्रुघ्न घोलप, हर्णस – प्रतिभा विजय पानसरे, वागजवाडी- निकिता ज्ञानेश्वर आवाळे,
भांबवडे- माधवी किरण सोनवणे, सांगवी बुद्रुक – सोनल गणेश घोरे, करंदी खे. बा. – नवनाथ गायकवाड, कासुर्डी गुं. मा – अजय तात्याबा मालुसरे, वाठार हिमा – सविता संजय खाटपे, कुरूंगवडी – अंजली सुभाष ननावरे, हरिश्चंद्री- सुनीता मारुती गाडे, तेलवडी- आरती किरण धावले, सांगवी निधान – मंगेश पालवे, करंदी बुद्रुक – अस्मिता गणेश वरखडे, म्हसर बुद्रुक – एकनाथ सदाशिव म्हसुरकर, वाठार हिंगे – मुरारी दत्तात्रय भालेराव, पारवडी – अमोल भाऊसो लिम्हण, म्हाकोशी – रजंना महादेव साळेकर.
निवडणुकीतील विशेष
म्हाकोशी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी उमेदवारापेक्षा नोटाला जास्त मते पडली. वॉर्ड 1 मधील निकाल काही वेळ राखून ठेवला होता. निवडणूक आयोगाच्या 12 नोव्हेंबर 2013 च्या आदेशानुसार अखेर निकाल जाहीर केला असून दुसऱ्या क्रमांकांचे मतं मिळालेल्या रेखा विजय साळेकर या 43 मते घेऊन विजय झाल्या. सांगवी हिमा येथील प्रभाग 3 मधील सर्वसाधारण पुरुष सदस्यांमध्ये समसमान मते मिळाल्याने तेथे निवडणूक नियमानुसार कौशल कुंडलिक बांदल हे चिठ्ठीद्वारे निवडून आले.