मेढा -ग्रामपंचायत निवडणुकीत जावली मतदारसंघातील 15 ग्रामपंचायतीं पैकी 14 ग्रामपंचायतीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवाद वर्चस्व राखत विरोधकांना धक्का देवून निर्विवाद वर्चस्व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राखले आहे. दरम्यान, कुसुंबी येथे सरपंचपदाच्या उमेदवारांना समसमान मते पडल्याने चिठ्ठीद्वारे सरपंचपदाचा कौल घेण्यात आला त्यात मारुती चिकणे हे विजयी झाले. या घटनेची चर्चा सर्व तालुक्यात रंगली आहे.
जावली तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. यातील केवळ मोरघर ग्रामपंचायत वगळता बाकीच्या 14 ग्रामपंचायतींवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाने आपली सत्ता स्थापन केली आहे. रामवाडी, केळघर, रिटकवली, वाकी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. या ग्रामपंचायतींवरही आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाने एकहाती वर्चस्व राखले. दरम्यान, निवडणूक झालेल्या रुईघर, वालुथ, करहर, ओझरे, घोटेघर, भोगवली तर्फ कुडाळ, शिंदेवाडी, आखाडे, कुसूंबी, सोमर्डी या ग्रामपंचायतींवरही आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाने विजय मिळवून विरोधकांना पाणी पाजले.
तीर्थक्षेत्रचा दर्जाअसणारे गाव कुसुंबी व तसेच जि.प.प्राथमिक शाळेचा नुकताच भारतात दुसरा नंबर आलेले गाव ओझरे यांच्यासह करहर हेही मुख्यबाजार पेठेचे गाव असून भोगवली तर्फ कुडाळ येथील सरपंच पदासाठी रस्सी खेच करण्यात आली होती.
केळघर केळघर तर्फ मेढा, रिटकवली, रामवाडी, वाकी या चार ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्या. तर मोरघर,सोमर्डी, ओझरे,करहर, कुसुंबी,आखाडे, भोगवली तर्फ कुडाळ, रुईघर,घोटेघर,करहर वालुथ, येथे समोरासमोर लढती झाल्या होत्या. सरपंच पदासाठी 25 उमेदवार तर सदस्य पदांसाठी 90 उमेदवार रिंगणात उभे होते.
त्यापैकी विजयी होऊन आलेले उमेदवार सोमर्डी येथे ललिता शांताराम जगताप सरपंच पदी विजयी, वालुथ येथे मनिषा कमलाकर भोसले सरपंचपदी विजयी, शिंदेवाडी येथे धनंजय धोंडीराम शिंदे सरपंचपदी विजयी, ओझरे येथे अजित निवृत्ती मर्ढेकर सरपंच पदी विजयी,आखाडे येथे सखाराम रघुनाथ गायकवाड सरपंच पदी विजयी करहर येथे सोनाली नरेंद्र यादव सरपंचपदी विजयी, मोरघर येथे शिवाजी गोविंद डोईफोडे सरपंचपदी विजयी, रुईघर येथे अंजना अंकुश बेलोशे सरपंचपदी विजयी, घोटेघर येथे उज्वला संदिप रांजणे सरपंचपदी विजयी, भोगवली तर्फ कुडाळ येथे समीर तुकाराम गोळे सरपंच पदी विजयी.
कुसुंबी येथे सरपंचपदासाठी साधू चिकणे व मारुती चिकणे दोघानाही समान मतदान 648 झाल्याने चिठ्ठी टाकून मारूती चिकणे विजयी झाले. निवडणूक निरीक्षक संगीता राजापूर चौगुले उपजिल्हाधिकारी भू संपादन जावळीचे निवडूक निर्णय अधिकारी तहसिलदार राजेंद्र पोळ,तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली मेढा बाजार पेठेमध्ये शांततेत निकाल आज जाहीर झाला.