मैदानाची केली पाहणी
रांजणगाव गणपती – मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य ते सहकार्य केले जाईल, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी दिली.
रांजणगाव कारेगावच्या शिवेवर ज्या मैदानात मनोज जरांगे यांची सभा होणार त्या मैदानाची पाहणी करुन सभेचे आयोजन करण्यार्या शिरूर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना गोयल बोलत होते. या प्रसंगी शेखर पाचुंदकर पाटील, बापुसाहेब शिंदे, रामभाऊ सासवडे,, राहुल गवारे, संदीप नवले, सोपान नरवडे,
नानासाहेब लांडे, अॅड. सुधीर ढमढेरे, वढु बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, संभाजी कर्डीले, कुमार नाणेकर, उमेश शेळके, विजय साळुंखे, रामभाऊ म्हस्के, शामराव खरबस, आप्पा टाव्हरे, सचिन कुटे, शामकांत वर्पे, रामदास दरेकर, परशुराम डांगे, किरण पठारे, जयवंत साळुंके आदींसह शिरूर तालुक्यातील अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
जिल्हाधिकार्यांनी या सभेच्या व मोर्च्याच्या अनुशंगाने सभेच्या व मोर्चाच्या ठिकाणी फिरती शौचालये उपलब्ध करुन द्यावीत, अशी मागणी शेखर पाचुंदकर, बापुसाहेब शिंदे व अॅड. सुधीर ढमढेरे यांनी केली. तसेच सोमवारी शासनाने जाहिर केलेल्या सुट्टीच्या अनुशंगाने व या सभेला होणार्या गर्दीच्या व मंगळवारी चंदननगर पर्यंतच्या प्रवासाच्या अनुशंगाने
पुणे-नगर महामार्गालगतच्या सर्व औद्योगिक वसाहती बंद ठेवण्याची सूचना केली असता याबाबत कंपन्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे गोयल यांनी सांगितले. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक महेश ढवाण, संजय जगताप, प्रमोद क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक नीळकंठ तिडके, अनिल मोरडे, शिवाजी मुंढे आदी उपस्थित होते.
वाहतुकीत बदल करणार
मनोज जरांगे यांची होणारी सभा व सभेसह मुंबईला आंदोलनाला जाणार्या नागरिकांची आकडेवारी पाहता. सोमवारी (दि. 22) व मंगळवारी (दि. 23) पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत आवश्यक तो बदल करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक अंकित गोलय यांनी दिले.