पुणे – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विविध विद्याशाखांची तिसऱ्या टप्प्यातील लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा विद्यापीठाने जाहीर केलेल्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येणार आहे.
दि. 22 जानेवारी रोजी अयोध्या येथील श्री रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे. त्यामुळे शासनाने सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, विद्यापीठाने हिवाळी सत्र परीक्षा जाहीर केलेल्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे राज्यातील सर्व परीक्षा केंद्रावर लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे, असे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले आहे.
या परीक्षेकरीता सर्व विद्यार्थी विद्यापीठाचे सर्व संलग्नित महाविद्यायातील अधिष्ठाता, प्राचार्य यांनी नोंद घ्यावी. तसेच नियोजित यावेळापत्रकाप्रमाणे होणाऱ्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, असे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे डॉ. कडू यांनी सांगितले आहे.