पुणे जिल्हा: ग्रामीण भागात बाधितांचा एक लाखाचा टप्पा पार

पुणे -ग्रामीण भागातील करोना वाढता संसर्गामुळे बुधवारी (दि. 17) बाधित संख्येने तब्बल 1 लाखांचा टप्पा पार केला आहे. दिवसभरात नवीन 858 करोना बाधित सापडले असून, आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. त्यामध्ये ग्रामीणमध्ये 641 आणि नगरपालिका हद्दीत 217 जणांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात आज एकूण बाधित संख्येने तब्बल 4 हजार 745 मजल मारली आहे.

ग्रामीण आणि नगरपालिका हद्दीत जानेवारी 2021 अखेर एकूण बाधित संख्या 85 हजार 969 इतकी होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून करोनाने पुन्हा डोके वर काढले आणि अवघ्या 45 दिवसांत 14 हजार 341 ने बाधित संख्या वाढली. या वाढत्या बाधित संख्येमुळे करोनामुक्तीचा वेग कमी झाला.

दरम्यान, आज ग्रामीणमधील एकूण करोना बाधित संख्या 1 लाख 277 वर पोहचली आहे. त्यामध्ये ग्रामीण भागात 77 हजार 764 तर नगरपालिका हद्दीत 22 हजार 513 इतके बाधित सापडले आहेत. आज दिवसभरात 3 हजार 767 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली. बाधित संख्येबरोबर करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही दिवसेंनदिवस वाढत आहे.

जानेवारी अखेरीस ग्रामीणमध्ये एकूण 2 हजार 126 जणांचा मृत्युची नोंद झाली. तर आज मृत्यूचा आकडा 2 हजार 224 वर पोहचला असून गेल्या दीड महिन्यांत करोनामुळे 98 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामध्ये ग्रामीणमध्ये 1 हजार 663 तर नगरपालिका हद्दीत 561 मृत्यूची नोंद आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.