पुणे – राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय अन्नयोजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थींचे आधार आणि मोबाइल क्रमांक 100 टक्के जोडण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. हे क्रमांक जोडले नसतील, तर स्वस्त धान्य मिळणार नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. आधार कार्डला रेशन कार्ड लिंक ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन प्रकारे करता येते.
रेशन कार्डला आधार लिंक हे रेशनच्या दुकानात जाऊन करता येते. रेशन कार्ड आधारकार्डला लिंक केल्यानं अनेक प्रकारे मदत होईल. तसंच रेशन कार्ड शोधणं आणि आधार कार्डच्या नंबरवरून रेशन कार्डबाबतची माहिती मिळू शकेल. यासाठी लिंक करणं महत्वाचं आहे.
रेशनमधील काळाबाजार बंद करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने प्रत्येक ग्राहकाचे रेशनकार्ड आधार क्रमांकाला जोडणे बंधनकारक केले होते. त्याची मुदत फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली होती. परंतु अद्यापही अनेकांनी आधारकार्ड रेशनकार्डला जोडले नसल्याने अशा कार्डधारकांचे मार्च महिन्यापासूनचे रेशन मिळणे बंद होणार आहे.
रेशन घोटाळे तसेच पात्र नसलेल्या ग्राहकांची नावे यादीत समाविष्ट करत त्यांच्या नावाने उकळले जाणारे रेशन आणि यातून होणारी शासनाची फसवणूक बंद करण्यासाठी शासनाने रेशन वितरण प्रणालीमध्ये मोठे बदल केले आहेत. बायोमेट्रिक प्रणालीसह धान्याचे वितरण तसेच प्रत्येक रेशनकार्डला आधारकार्ड लिंक करणे, रेशन कार्डला नाव असलेल्या प्रत्येक सदस्याचे आधार लिंक करणे बंधनकारक केले आहे. यातून पात्र आणि खरोखर गरज असलेलेच लाभार्थी समोर येतील. त्यामुळे आपोआपच इतरांची नावे कमी होतील. जवळपास सर्व सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर काही महत्त्वाच्या कागदपत्रांना आधार लिंक असणं गरजेचं आहे. म्हणून जाणून घ्या रेशन कार्ड – आधार लिंक करण्याची सोपी पद्धत
सोपी पद्धत
-राज्याच्या PDS पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मोबाइल नंबर सबमिट करा.
-आपल्याकडे असलेला चालू मोबाईलनंबरवर ओटीपी दिल्यानंतर रेशन कार्ड आधार कार्ड लिंकिंग प्रोसेस पूर्ण होईल. त्याबाबतचे मेसेज मोबाइलवर येतील.
-आपण हे करताच आपल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. हे भरल्याबरोबर प्रविष्ट करा आणि पुष्टी करा. या प्रक्रियेनंतर आपण आधार, रेशन कार्ड कनेक्ट व्हाल.