लाखणगाव – नारायणगाव एसटी आगाराची बंद असलेली मंचर-लाखणगाव बस सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले, तसेच लाखणगाव, देवगाव, काठापूर बुद्रुक, पारगाव येथील नागरिकांनी एसटी चालक-वाहकाचे एसटी चालू झाल्याबद्दल सत्कार केले.
मंचर-लाखणगाव मुक्कामी एसटी बस बंद असल्याने अनेकांची गैरसोय झाली होती. ही बस सुरू व्हावी म्हणून लाखणगाव, देवगाव, काठापूर बुद्रुक या ग्रामपंचायतींनी अनेक वेळा पत्रव्यवहार केला, तसेच सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विवेक वळसे पाटील, रामदास वळसे पाटील यांच्याकडेही आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक मनोज रोडे पाटील,देवगावचे सरपंच दीपाली खांडगे, उपसरपंच दिलीप दाभाडे, सरपंच प्राजक्ता रोडे पाटील,
माजी सरपंच दस्तगीर मुजावर,काठापूरचे सरपंच अशोक क रंडे, माजी उपसरपंच विशाल करंडे यांनी पाठपुरावा केला असता त्याची दखल घेत बरेच दिवस बंद असणारी लाखणगाव मुक्कामी बस सेवा सुरू झाली आहे. एसटी चालक आणि वाहक प्रसंगी देवगावचे उपसरपंच दिलीप दाभाडे,
बाळासाहेब खांडगे, गोविंद खांडगे, नीलेश खांडगे, पोपट गावडे, ग्रामपंचायत सदस्य मोहन पोखरकर, विशाल खांडगे,सुभाष खांडगे, नितीन पोखरकर, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर दाभाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.