कोरेगाव भीमा – कॉंग्रेसचे कर्नाटकचे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रियांक खर्गे यांनी वीर सावरकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटले असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीने रस्त्यावर उतरत निषेध नोंदवून प्रियांक खर्गेंच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले.
कोरेगाव भीमा येथे भाजपाच्या वतीने खर्गे यांचे पुत्र, प्रसारणमंत्री खर्गे यांनी नुकतेच बेळगाव येथील विधानसभेत वीर सावकार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करीत खर्गेंच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश कुटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप सातव, दत्ता हरगुडे, नवनाथ भुजबळ, श्रीकांत नरके, प्रवीण फडतरे, गणेश गव्हाणे, नितीन गव्हाणे, गौरव झुरुंगे, समीर झुरुंगे, राहुल कुटे, बापू भुजबळ, रवींद्र गव्हाणे, नागेश गव्हाणे, संपत गव्हाणे, दत्ता जोरे, अमोल गव्हाणे, सतीश गव्हाणे, ओंकार गुंडाळ, सुनील सव्वाशे, दत्ता गव्हाणे, आयुष मिश्रा, अशोक हरगुडे उपस्थित होते.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. यापुढे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असे प्रकार पुन्हा घडल्यास त्यांना काळे फासल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांनी दिला आहे. यावेळी शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, विकास कुंभार, सचिन मोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.