कोरेगाव भीमा -शिरूर तालुक्यातील पत्रकारांसाठी पत्रकार भवन, आरोग्य विमा, टोल माफी, प्रवास सवलतींसाठी लवकरच प्रयत्न करणार आहे. अशी ग्वाही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हास्तरीय ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. डॉक्टर, पोलीस, पत्रकार हे करोना योद्धे असून त्यांची सर्वोतोपरी काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे.
पत्रकारांना सोयी, सुविधा व शासकीय योजनांचा लाभ व त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करू, पत्रकारांना एकत्रित येण्यासाठी पत्रकार भवन, आरोग्य विमा, एसटी, रेल्वे प्रवासात सवलत, ज्येष्ठ पत्रकारांना मानधन, शासकीय वसाहतींमध्ये घरांचा राखीव कोठा, शासकीय विश्रामगृहात सुविधा, पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक सोयी, सुविधा मिळणेबाबत राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या ऑनलाईन झूम बैठकीत खासदार कोल्हे यांच्याकडे वरील मागण्या पत्रकारांनी केल्या होत्या. यावेळी पत्रकारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.