रेडा-दैनिक प्रभातचा दीपोत्सव अंकात दर्जेदार साहित्य लिखित करण्यात आले आहे. तब्बल 27 लेखकांनी दिवाळी सणाचा गोडवा वाढविण्यासाठी दीपोत्सवमध्ये लिखाण केले असल्याचे गौरवोद्गार माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
इंदापूर शहरातील भाग्यरत्न निवासस्थानी माजी मंत्री पाटील यांनी प्रभातच्या दीपोत्सव अंकाचे स्वागत केले. यावेळी प्रभात इंदापूर तालुका प्रतिनिधी नीलकंठ मोहिते,सिनेअभिनेते शिवकुमार गुणवरे, सामाजिक युवा कार्यकर्ते प्रशांत उंबरे, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता आर. डी. झगडे उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, दैनिक प्रभातच्या माध्यमातून नि:पक्षपाती लिखाण प्रसिद्ध सातत्याने होत असते. त्यामुळे सर्व स्तरांमध्ये प्रभातचे महत्त्वाचे स्थान आहे. दिवाळी सण हा सुट्टीचा सण असतो. यामध्ये दर्जेदार साहित्य वाचायला मिळणे ही एक अनोखी पर्वणी असते. ही पर्वणी दीपोत्सवच्या माध्यमातून जपली जात आहे. नीलकंठ मोहिते यांनी स्वागत केले.