मेलबर्न – भारतीय संघ अव्वल दर्जाचा असून भारतीय संघातील खेळाडूही जागतिक कीर्तीचे आहेत. मला जर भारतीय संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली तर मी माझे अव्वल प्रदर्शन करेल. मी भारताविरुद्ध खेळण्यास तसेच भारतीय फलंदाजांसमोर गोलंदाजी टाकण्यास सज्ज आहे, असे म्हणत मिशेल स्वेप्सनने भारतीय फलंदाजांना आव्हान दिले आहे.
तसेच जगातल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांसमोर माझी टेस्ट करायला मला नक्कीच आवडेल. विराट अनुभवी बॅट्समन आहे. त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करण्यास नक्कीच मजा येईल, अशा खास शैलीत त्याने उत्तर दिले.
दरम्यान, मिशेल स्वेप्सनची अंतिम 11 खेळाडूंमध्ये वर्णी लागेल की नाही, हे सांगता येत नाही. कारण नॅथन लायनसारखा अनुभवी गोलंदाज ऑस्ट्रेलियाकडे आहे. शेफील्ड शिल्डमध्ये मिशेल स्वेप्सनने चमकदार कामगिरी केली होती. बांगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. मात्र करोनामुळे ती मालिका स्थगित करण्यात आली होती.