ओझर – अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओझर येथे संकष्टी चतुर्थी निमित्त सुमारे एक लाख भाविकांनी विघ्नहराच्या दर्शनाचा लाभ घेतला.
पहाटे 5 वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, सचिव दशरथ मांडे, विश्वस्त श्रीराम पंडित, राजश्री कवडे व ग्रामस्थ यांच्या हस्ते श्रींना महाअभिषेक पूजा करून दर्शानासाठी मंदिर खुले करण्यात आले. मंदिरामध्ये चतुर्थी निमित्त महाआरती करण्यात आली. महाआरतीचा मान भाविक प्रशांत हयातनगर, अरुण अधिकारी, सुमित पटेल, सचिन वाघ,कार्तिक पारखी यांना देण्यात आला.
सकाळी 7.30 वा. व दुपारी 12 वाजता मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी 8 वाजता नियमित पोथी वाचन करण्यात आले. सकाळी 10.30 वाजता ‘श्रीं’स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. सायंकाळी 7 वाजता नियमित हरिपाठ करण्यात आला. व चंद्रोदयापर्यंत कीर्तनकार संतोष महाराज बढेकर यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना साथसंगत राम प्रसादिक भजनी मंडळा शिरोली यांनी दिली. तर संभाजी दत्तात्रय बोडके यांनी चतुर्थीचे वारकरी अन्नदान केले.
सायंकाळी 7 वाजता धुपारती होऊन रात्री10.30 वाजता शेजआरती करून 11 वाजता मंदिर बंद करण्यात आले. आजच्या महाआरतीच्या मानकरी यांनी विकास कामात सहभागी होवून ट्रस्टला देणगी दिली. आलेल्या भाविकांचे स्वागत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे.उपाध्यक्ष अजित कवडे, सचिव दशरथ मांडे, खजिनदार कैलास घेगडे, विश्वस्त बी. व्ही. मांडे, रंगनाथ रवळे,आनंद मांडे, किशोर कवडे, गणपत कवडे, मंगेश मांडे, मिलिंद कवडे, कैलास मांडे, विजय घेगडे, श्रीराम पंडित, राजश्री कवडे यांनी केले. गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक व कर्मचार्यांनी केले.