फलटण – उपळवे, ता. फलटण येथील स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड संचलित लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखान्याने उच्चांकी ऊसदर दिला आहे. गाळपासाठी आलेल्या उसाची प्रतिटन 3101 रुपयांप्रमाणे रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आली आहेत.
त्यामुळे शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त केले जात आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज साखर कारखाना यशस्वीरित्या सुरू आहे.