Priyanka Chaturvedi । भाजपचे उत्तर मुंबईतील उमेदवार पियुष गोयल यांचे पुत्र ध्रुव गोयल यांच्या कांदिवलीतील ठाकुर कॉलेजमधील एका कार्यक्रमामुळे सध्या नवा वाद निर्माण झालाय. पीयूष गोयल यांच्या मुलाच्या भाषणाला जबरदस्तीने बसवले गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. कॉलेज प्रशासनानं विद्यार्थ्यांची आयकार्ड जप्त करून त्यांना या सेशनसाठी बसण्याची सक्ती केल्याचाही विद्यार्थ्यांचा आरोप होता. तर या मुद्दयावरून ठाकरे गटाकडून कॉलेजच्या प्राचार्यांना खरमरीत पत्र लिहिलण्यात आले आहे.
कार्यक्रमाला जबरदस्तीने बसवलं Priyanka Chaturvedi ।
ध्रुव गोयल यांच्या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्याला जबरदस्तीने बसवलं गेलं. तसेच आपले आयकार्ड जप्त केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. या संबधीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यावर या व्हिडीओत फेरफार करुन अवास्तव वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत ठाकूर कॉलेज प्रशासनाने स्पष्टीकरण दिले. कॉलेजच्या या स्पष्टीकरणावर प्रियंका चतुर्वेदींनी एक खरमरीत पत्र लिहून प्राचार्यांना खडेबोल सुनावले.
Shame on the college which first gives platform to a politically affiliated person to create ‘voter awareness’
Makes the students compulsorily attend the event by taking their IDs away
Yet, Thakur College Principal and Management has the audacity to accuse me.
My response to… pic.twitter.com/cMUJlRE7PG— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) March 23, 2024
याविषयी प्रियंका चतुर्वेदींनी,”ट्विट केलेला व्हिडीओ एका माध्यमाच्या ट्विटर हँडलवरील आधीच होता. त्यावरून प्राचार्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागायला हवी होती. मात्र त्यांनी तसं केलं नाही. प्राचार्यांमध्ये थोडी जरी नैतिकता उरली असेल तर त्यांनी त्वरीत आपल्या पदावरुन राजीनामा द्यायला हवा.”असे त्यांनी म्हटले. त्यासोबतच मतदार जागृती कार्यक्रम राबवताना एकाच विशिष्ट राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या कुटुंबातील व्यक्ती कसा हजर होता? माझ्याकडे माहिती आणि त्यासंबंधी पुरावे देखील आहेत. त्यामुळे आधी तुम्ही माझी माफी मागितली पाहिजे अशी मागणी चतुर्वेदींनी पत्राच्या माध्यमातून केलीय.
प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रात नेमकं काय लिहिलंय? Priyanka Chaturvedi ।
तुमच्या कॉलेजने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या संदर्भात तुम्ही जारी केलेल्या प्रेस रीलीझमध्ये तुम्ही काही स्पष्टीकरण दिलं आहे. खासदार या नात्याने, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आणि शहरातील रहिवासी या नात्याने समस्या मांडण्याचा, मीडिया रिपोर्ट्सवर आधारित मुद्दे मांडण्याचा मला अधिकार आहे. त्यामुळे माझ्यावर आरोप करणारी प्रेस नोट जारी करण्याऐवजी तुमच्या विद्यार्थ्यांचा राजकीय प्रचारासाठी वापर करू नका. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.