Pravin Darekar | Supriya Sule | Sunetra Pawar : भाजपला बारामतीत येऊन विकास करायचा नाही, तर शरदचंद्र पवार यांना हरवायचे आहे. मात्र, भाजपला ते शक्य होत नसल्याने, त्यांनी आमचेच घर फोडून आमची आईसमान असलेल्या वहिनीला निवडणुकीत उतरवले, विचार करा ना? असे बोलत खासदार सुप्रिया सुळे निःशब्द झाल्या. या वेळी माझी लढाई ही कोणा व्यक्तीशी नसून, वैचारिक आहे. भाजप घेत असलेल्या चुकीच्या निर्णयाविरोधात आहे, असे स्पष्टीकरणही सुळे यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत सुनेत्रा पवार यांचीही उमेदवारी जाहीर झाल्यामुळे सुळे (पवार) विरुद्ध पवार म्हणजे नणंद- भावजय अशी यंदाची लढाई पाहायला मिळणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता, माझी लढाई कोणा व्यक्तीशी नसून, वैचारिक आहे.
मोठ्या भावाची बायको म्हणजे वहिनी ही आपल्या आईसमान असते. भाजपला पवारांना हरवता येत नसल्यामुळे त्यांनी आमचेच घर फोडून आज आमच्या आईला निवडणुकीत उतरवले, असा शब्दांत सुळे यांनी भाजपचा समाचार घेतला. यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या. मात्र, आता यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सुप्रिया सुळे खोचक सल्ला दिला आहे. । Pravin Darekar | Supriya Sule | Sunetra Pawar
प्रसार माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, ‘आपली मोठी वहिनी आईसमान असल्याच सुप्रिया सुळे सांगत आहेत. भाजपा घरफोड्या करत असल्याचा आरोप त्या करतात. सुप्रिया ताई महाराष्ट्रातील जनतेला नीट माहित आहे, फोडाफोडीच राजकारण करणारा नेता या राज्यात कोण आहे? ज्याने या महाराष्ट्रात अनेक घर फोडली. तो घरफोड्या कोण? हे महाराष्ट्राला नीट माहिती आहे. जर तुम्हाला वहिनी आईसमान वाटतात. मग तुम्ही आई विरोधात निवडणूक नका लढवू. त्या आईला तुम्ही समर्थन द्यायला पाहिजे’, असे दरेकर म्हणाले. । Pravin Darekar | Supriya Sule | Sunetra Pawar