Lok Sabha Election 2024 । राज्यातल्या लोकसभा निवडणुकीचे दोन टप्प्यांचं मतदान पार पडलंय. मात्र आता राज्यात सर्व पक्षांनी सभांचा धडका सुरु केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांमध्ये सहा सभा घेत आहेत.
आज मंगळवारी माळशिरसमध्ये रणजितसिंह निंबाळकर, लातूरमध्ये सुधाकर श्रृंगारे आणि धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत आहे. यावेळी माळशिरसमध्ये मोदी यांनी प्रचार सभेत बोलतांना पुन्हा एकदा गेल्या १० वर्षातील सरकारच्या कामाचा आराखडा सांगितलं. तसेच शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली.
Lok Sabha Election 2024 । 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं
नरेंद्र मोदी म्हणाले, ‘काँग्रेसने गेल्या २५ वर्षात जे काम केले त्यांच्या दुप्पट काम आम्ही १० वर्षात केले आहे. भाजप सरकारने 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं, आमच्या ६० वर्षात जे झालं नाही ते आम्ही करत आहोत असा दावाही मोदी माळशिरस येथील प्रचार सभेत केला आहे. ते पुढे म्हणाले, मात्तबर नेत्याने ऊसाला भाव दिला नाही असा म्हणत मोदी यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीका केली.
Lok Sabha Election 2024 । राम मंदिराचं स्वप्न मी पूर्ण करून दाखवलं
सभेत बोलतांना मोदी म्हणाले,’आमच्या सरकारने राम मंदिराचं स्वप्न मी पूर्ण करून दाखवलं. आम्हाला अनेक संतांचा आशीर्वाद आहे.’ असेही ते यावेळी म्हणाले
Lok Sabha Election 2024 । काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
पंतप्रधान मोदी यांनी माळशिरस येथील सभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तुमची संपत्ती लुटणारं सरकार हवं आहे का? काँग्रेसवाले संधी मिळाल्यास तुमची संपत्ती वाटणार, असं मोदी म्हणालेत.
पहा लाईव्ह
LIVE |📍माढा | मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा 🪷 @narendramodi#Maharashtra #Narendramodi #PhirEkBaarModiSarkar #AbkiBaar400Paar #LokSabhaElections2024
https://t.co/DvWRYSCmcg— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 30, 2024