Accident News । नाशिक जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. चांदवड जवळील राहुड घाटात एसटी बस व ट्रकची जोरदार धडक झाली. अपघातात सात ते आठ प्रवासी दगावल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहूड घाटात हा अपघात घडला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. जखमींना घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जात आहे. अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
दरम्यान. राज्यात आजचा दिवस अपघाताचा दिवस ठरला. आज तीन जिल्ह्यात तीन अपघातात 9 लोकांनी आपला जीव गमावला आहे. नांदेडमध्ये सिमेंट नेणाऱ्या ट्रकची धडक बसून एकाचा मृत्यू झाला. तर मुंबई -आग्रा महामार्गांवर चांदवडच्या राहूड जवळ एसटी-ट्रकचा भीषण अपघातामध्ये 5 प्रवाशांनी जीव गमावला. एवढंच नव्हे तर कर्नाटकच्या इंडी तालुक्यातील सिद्धलिंग महाराज मठाच्या रथोत्सवात दुर्घटना घडली.
नांदेडमध्ये सिमेंटच्या ट्रकची ८ दुचाकींना धडक Accident News ।
नांदेडमध्ये सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकची 8 दुचाकींना धडक बसून भीषण अपघात झाला. या भयानक अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या ट्रकने ८ ते १० बाईक्सना जोरदार धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा अपघात नेमका कशामुळे घडला, त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. यामध्ये एका व्यक्तीचा घटनास्थळी मृत्यू झाला तर इतर पाच जण जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना नांदेड येथे हलवण्यात आले आहे. या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सिद्धलिंग महाराज मठात 3 भाविकांचा मृत्यू
तर दुसरी घटना कर्नाटकच्या इंडी तालुक्यातील लच्याण गावात घडली. या गावात सिद्धलिंग महाराज मठाच्या रथोत्सवात हा दुर्दैवी प्रकार घडला. इंडि तालुक्यातील लच्याण गावात रथ अंगावरून गेल्याने 3 भाविकांचा मृत्यू झाला. बंडप्पा कटकधोंड, शोभू कटकधोंड आणि अभिषेक मुजगुंड हे तीन भाविक चेंगरून मृत पावले. 100 वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेच्या रथोत्सवाला कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र आणि तामिळनाडूतून जवळपास 2 लाख भाविक उपस्थित असतात.