भिगवण, (वार्ताहर)- प्रवासी दिन दरवर्षी अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने साजरा केला जातो. बारामती रेल्वे स्टेशन येथे सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा (रेल्वे) वापर करणार्या प्रवाशांचे गुलाब पुष्प, तीळगूळ, पाणी बाटली देऊन स्वागत केले.
चालक (लोको पायलट, को – पायलट), रेल्वे गार्ड यांचा शाल, श्रीफळ फेटा देऊन सत्कार करण्यात आला. रेल्वे इंजिनची पूजा करून सर्व प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. जास्तीत जास्त सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी श्राजेंद्र केसकर (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी), राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे तुषार झेंडे पाटील, वाहन निरीक्षक पाटील, स्टेशन मास्तर पी. यू. पाटील बारामती, जिल्हा ग्राहक परिषदेचे दिलावर तांबोळी, प्रमोद जाधव, नंदकुमार तावरे, राजेंद्र निंबाळकर आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकर्ते स्वप्निल सुर्यवंशी, खंडागळे, नागेश देशमाने उपस्थित होते.