Jammu and Kashmir : पृथ्वीवर कुठेही स्वर्ग असेल तर तो काश्मीरमध्ये आहे. काश्मीर हे जगातील सर्वात सुंदर ठिकाण असल्याचे म्हटले जाते. बर्फाच्या चादरीने झाकलेले हे शहर स्वतःमध्ये स्वर्गापेक्षा कमी नाही. जगभरातून लोक या सुंदर निसर्गरम्य दृश्याचा आनंद घेण्यासाठी येथे येतात. आता या अप्रतिम लँडस्केपची झलक देण्यासाठी, भारतीय रेल्वेने एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये जम्मू-काश्मीरमधून बर्फाच्छादित ट्रेन जात असल्याचे दाखवले आहे.
भारतीय रेल्वेने शेअर केला व्हिडिओ !
भारतीय रेल्वेने या आश्चर्यकारक दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर शेअर केला आहे. तसेच ट्विट करत, “भारतीय रेल्वेसह जम्मू आणि काश्मीरच्या बर्फाच्छादित विलक्षण दृश्याचा अनुभव घ्या,” म्हंटल आहे. सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
Experience the stunning view of a snow-clad Jammu and Kashmir with Indian Railways. pic.twitter.com/5xBHV67hT4
— Ministry of Railways (@RailMinIndia) February 10, 2024
व्हिडिओच्या सुरुवातीला एका स्टेशनवर एक ट्रेन दिसत आहे. ट्रेन बर्फाने झाकलेली आहे हे पाहणे खूप आश्चर्यकारक आहे. क्लिप जसजशी पुढे सरकत जाते तसतशी ट्रेन विविध क्षेत्रांमधून जात असल्याचे दिसते. ट्रेन हिवाळ्यात या परिसराचे सौंदर्य दर्शवते.
व्हिडिओ पोस्ट झाल्यापासून सुमारे 90 हजार लोकांनी तो पाहिला आहे आणि सुमारे 2700 युजर्सनी त्याला लाईक केले आहे. या व्हिडिओवर लोक त्यांच्या प्रतिक्रियाही देत आहेत. हे मंत्रमुग्ध करणारे दृश्य पाहून एका यूजरने लिहिले की, ‘हे खूप सुंदर दृश्य आहे’.
तर काहींनी ‘मी या पर्यटन स्थळाला भेट देण्यास तयार आहे’ असे लिहिले आहे. इतरांनी लिहिले, ‘व्वा.’ तर एकाने इथे, ‘पुढच्या वर्षीच्या सहलीची पुष्टी केली.’ थम्स अप इमोटिकॉन वापरून तिसऱ्यानेही त्यांची प्रतिक्रिया दर्शवली.