पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील तारगांव-मसूर-शिरवडे या मार्गावरील दुहेरीकरण आणि तांत्रिक काम सुरू आहे. त्यामुळे हे काम पूर्ण करण्यासाठी पुढील दोन दिवस ब्लाॅक घेण्यात आला असून, दि. 22 रोजी कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस आणि दि. 23 रोजी पुणे-कोल्हापूर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
तसेच दि. 22 फेब्रुवारीला कोल्हापूर-सातारा डेमूचा प्रवास कराड येथे संपेल. तर सातारा-कोल्हापूर डेमू कराड येथून सुटेल. त्यामुळे ही डेमू सातारा-कराड यादरम्यान रद्द होईल. याच दिवशी पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेसचा प्रवास सातारा येथे संपेल आणि कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस प्रवास सातारा येथून सुरू होईल. त्यामुळे सातारा ते कोल्हापूर हा प्रवास रद्द होईल. दि. 23 रोजी पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द असतील.