आळंदी,(वार्ताहर)- जि. प. प्राथमिक आदर्श शाळा धानोरे येथील 4थीच्या विद्यार्थ्यांना रयतेच्या सुखासाठी अविरत लढणारा माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य पराक्रमाची गाथा समाजातील प्रत्येकाच्या हृदयातून पेटून उठावी.
तसेच बालमनावर त्यांची शौर्यगाथा उमटावी या हेतूने शिवरायांच्या राजमुद्रेची प्रतिकृती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. त्याचबरोबर राजमुद्रेवरील मजकूर मुलांकडून पाठांतर करून घेवून त्याचा अर्थ सांगण्यात आला. याच उपक्रमातून जीरेटोप बनविण्याचे ही मार्गदर्शन करण्यात आहे.
अशा नाविन्यपूर्ण उपक्रमातून मार्गदर्शक शिक्षिका शैला जिजाबा जांभळकर यांनी शिवजयंती सोहळ्यासाठी आपल्या उपक्रमातून बालमनावर शिवरायाच्या पराक्रममाला व शौर्याला वंदन केले. शाळेचे मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती व सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थ यांनी मार्गदर्शक शिक्षिका शैला जांभळकर(गावडे) यांचे कौतुक केले.