नवी दिल्ली- गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात चित्रित करण्यात आलेल्या दृश्यांवर आणि कपड्यांच्या रंगावर आता आक्षेप घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आक्षेप घेतला आहे. वेशभूषा न बदलल्यास एमपीमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर पठाण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला आहे.
पठाणमधील ‘बेशरम रंग’ हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या गाण्यात दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानच्या बोल्ड डान्स स्टेप्सला आणि भगव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करण्यात आल्यामुळे ट्रोल केले जात आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी तर वेशभूषा न बदलल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ द्यायचा की नाही याचा विचार करू, असे सांगितले आहे.
दरम्यान, आता चित्रपटातील हाच मुद्दा उपस्थित करत ‘सिंघम’ फेम अभिनेते प्रकाश राज यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी या गाण्याला आपला पाठिंबा दर्शविला आहे. सध्या त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
#Besharam BIGOTS.. So it’s okay when Saffron clad men garland rapists..give hate speech, broker MLAs, a Saffron clad swamiji rapes Minors, But not a DRESS in a film ?? #justasking
….Protesters Burn Effigies Of SRK In Indore. Their Demand: Ban ‘Pathaan’ https://t.co/00Wa982IU4— Prakash Raj (@prakashraaj) December 15, 2022
काय म्हणाले प्रकाश राज, “भगव्य कपड्यांमध्ये पुरुष बलात्काऱ्यांचा सत्कार करतात, प्रक्षोभक भाषणं दिली जातात, आमदार फोडली जातात, भगवी कापडं घातलेले स्वामीजी लहान मुलांवर बलात्कार करतात, हे सगळं चालतं का? पण एका चित्रपटातील ड्रेस तुम्हाला पटत नाही? हा ढोंगीपणा आहे”. असं ट्विट त्यांनी केलं आहे.