पुणे – पोस्टल लाइफ इन्शुरन्स आणि रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स प्रीमियम भरण्यासाठी भारतीय पोस्ट विभागाने 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे पोस्ट विभागाने म्हटले आहे.
त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांतील प्रीमियम भरण्यासाठी पॉलिसी धारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. पोस्ट विभागाने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, पोस्टल लाइफ इन्शुरन्स 64 लाख 62 हजार लोकांनी काढलेला आहे. तर, रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स अडीच कोटी लोकांनी काढला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना विम्याची सोय व्हावी, कमकुवत गटांना व महिलांना विमा काढता यावा यासाठी विमा योजना पोस्ट विभागाने सुरू केली आहे.