अमित ठाकरेंचे राजकीय लॉन्चिंग; ‘या’ पदाची दिली जबाबदारी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईत पार पडत आहे. या अधिवेशनात मनसेचा झेंडा नव्या स्वरूपात सादर केला करण्यात आला. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचेही लॉन्चिंग करण्यात आले आहे. मनसेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांच्या निवडची घोषणा बाळा नांदगावकर यांनी केली.

यावेळी अमित ठाकरे यांनी वडील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले. ते म्हणाले कि, राज ठाकरे यांनी काल संध्याकाळी मला आज ठराव मांडला जाणार असल्याची माहिती दिल्याने पायाखालची जमीन सरकली होती, असे त्यांनी सांगितले. पक्षाचं १४ वर्षातील हे पहिलं अधिवेशन असून २७ वर्षात पहिल्यांदा स्टेजवर बोलत आहे. याआधी जे प्रेम, प्रतिसाद दिला आहे तो यापुढेही द्याल, अशी अपेक्षाही त्यांनी मनसे कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली. यावेळी शिक्षणासंदर्भात ठराव मांडला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here