पुणे : येरवड्यात भाजीपाला विक्रेत्याकडून पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली. येरवडा परिसरात लक्ष्मी नगर मध्ये शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.
येरवडा परिसरात कोरोना प्रादुर्भाव वाढलेल्या (कंटेन्मेंट झोन) मध्ये दुपारी दोननंतर भाजीपाला विक्रीसाठी हातगाडीवर फिरू नका असे सांगितल्यावरून भाजीपाला विक्रेते आणि त्यांचे नातेवाईक असे एकूण पाच ते सहा जणांनी पोलीस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घातली तसेच त्याला मारहाण केली. या मारहाणीत पोलीस कर्मचारी जखमी झाला.
वसिम हैदरअली मोगले (वय २०), हैदरअली सरदार मोगले (वय ४० दोघे रा. लक्ष्मी नगर, येरवडा) आणि इतर चार आरोपीविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.