मुंबई : लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह आता या जगात राहिला नसून त्याने फास घेऊन आत्महत्या केली. मुंबईमधील राहत्या घरी त्याने हे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेमुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
अनेक सिनेअभिनेत्यांनी याबाबत शोक व्यक्त केला. अजय देवगण लिहतो, सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूची बातमी खरोखर सुन्न करणारी आहे. त्याच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांना या दुःखातून सामोरे जाण्याची शक्ती मिळो. तसेच त्याच्या आत्म्यास सर्वकाळ शांती मिळावी.
The news of Sushant Singh Rajput’s death is truly sad. What a tragic loss🙏 Deepest condolences to his family & loved ones. May his soul find eternal peace.
— Ajay Devgn (@ajaydevgn) June 14, 2020
अनुपम खेर ट्विटर वर लिहले आहे ‘ मेरे प्यारे सुशांत सिंह राजपूत….आख़िर क्यों?….क्यों?’
मेरे प्यारे सुशांत सिंह राजपूत….आख़िर क्यों?….क्यों? 💔
— Anupam Kher (@AnupamPKher) June 14, 2020